पवारांची निवृत्तीची निर्णय घेताच विकिपीडियावर NCP चे राष्ट्रीय अध्यक्षपद Vacant
NCP National President Vacent on Wikipedia : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. कुठंतरी थांबण गरजेचं आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता विकिपीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद रिक्त असल्याचा बदल करण्यात आला.
पवारांच्या या घोषणेमुळे NCP मध्ये मोठे नाट्य पहायला मिळाले. त्यांच्या निर्णयाने उपस्थितितांच्या डोळे पाणावले होते. कार्यकर्ते, नेते सगळेच अतिशय भावूक झाले होते. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावी, अशी आग्रह कार्यकर्त्यांनी केली. मात्र, पवार हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळं कार्यकर्त्यांनी वाय. सी. सेंटरच्या बाहेर आंदोलन केलं. पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या विरोधात विरोधकांना एकत्र करणाऱ्या पवारसाहेबांनी निवृत्तीचा निर्णय घ्यायला नको होता, अशा प्रतिक्रिया येत आहेत. असं असतांनाच विकिपीडियाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पानावरही बदल करण्यात आला. विकीपीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पद आता VACANT असं दाखवत आहेत.
काँग्रेसला शरद पवारांची गरज का? बाळासाहेब थोरातांनी सांगितले कारण
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी घोषणा केली. 1 मे 1660 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुठंतरी थांबायचा सुध्दा विचार केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये, आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवाजदी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगितलं. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय हा राजकारण ढवळून काढणारा ठरला. या घोषनेनंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावर पवारांनीही प्रतिक्रिया दिली. निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला असला तरी पक्षात राहणार आहे, फक्त पदावर नसेल, एवढंच म्हटलंय, असे ते म्हणाले.
अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा करतानाच शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गळीत करावी अशी विनंती केली. त्यानंतर लगेच विकिपीडियावरही NCP President हे पद vacant असा बदल केला. त्यामुळं आता राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार हेच पाहणं महत्वाचं आहे.