मोदीजी, 2022 च्या ‘त्या’ वायद्याचं घोडं कुठं अडलंय, राष्ट्रवादीचा सवाल…

मोदीजी, 2022 च्या ‘त्या’ वायद्याचं घोडं कुठं अडलंय, राष्ट्रवादीचा सवाल…

ठाणे : 2022 हे वर्ष संपायला अवघे काहीच तास उरले आहेत. 2022 अंति मोदी सरकारने आपल्याला काय-काय वायदा केला होता? त्यातील प्रमुख वायद्यांची आठवण राष्ट्रवादीने करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबत सरकारला जाब विचारताना अनेक सवाल उपस्थित केले आहे.

महेश तपासे म्हणाले, या देशाचं सकल उत्पन्न दहा टक्क्यांपर्यंत 2022 अंती जाईल, ते आज साडे सहा टक्क्यांवर आहे. या देशातल्या सर्व नागरिकांना स्वतःच्या हक्काचं निवास मिळेल, तशी आज परिस्थिती नाही.

या देशातला शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होईल, असं सांगितलं मात्र परिस्थिती उलट आहे. या देशाचं कुपोषण 2022 पर्यंत संपेल, मात्र देखील फोल ठरले आहे. या देशात गुंतवणुकीचे दर 36 टक्क्यांपर्यंत जाईल, मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचे तपासे यांनी सांगितले.

असे अनेक वायदे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे मोदी सरकारने सांगितले होते. आज त्या वायद्याचं काय झालं? हा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारत आहे. मोदी सरकारचं फक्त निवडणुकीकडेच लक्ष असतं. मात्र जे वायदे केले आहेत त्याच्याकडे कितपत लक्ष आहे हे आता जनतेने ठरवावं, असं देखील तपासे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube