संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपांना निलेश राणेंचं तिखट उत्तर, ट्वीट करत मोठा गौप्यस्फोट
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसेनात. दोन्ही नेते रोज एकमेकांवर जहरी टीका करताना दिसताहेत. आता संजय राऊत यांनी आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही, असा दावा शनिवारी केलाय, त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत जहरी टीका केलीय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यांशी झालेल्या वादानंतर राणे यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याचं वक्तव्य केलंय. राणे म्हणाले की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा असं म्हटलंय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपांना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले की, राणे यांनी आदित्य ठाकरेंवर किती घाणरडे आरोप केलेत, काहीही पुरावे नसताना आदित्य ठाकरेंची बदनामी केलीय. रश्मी ठाकरेंविषयी ते कोणत्या भाषेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते? राणे यांच्या वक्तव्यावर आत्ताच माझं उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणं झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते. खरंतर राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधी त्यांना भेटलो नाही. मी कधी बेमान, गद्दांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. मात्र राणे यांना आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली असेल.
नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणेंनी ट्वीट करत खासदार संजय राऊत यांचा दावा खोडला आहे. निलेश राणे यांनी संजय राऊत यांनी संसदेतील फोटो ट्वीट केला. त्या फोटोमध्ये संसदेत संजय राऊत यांच्यासोबत नारायण राणे देखील दिसताहेत. निलेश राणे यांनी वादग्रस्त शब्दात लिहून हा कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळं आता त्यावर संजय राऊत काय उत्तर देणार? हे पाहावं लागणार आहे.