आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा…; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Nitesh Rane On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या’सामना’मध्ये आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा असं वाक्य छापून आलेलं आहे. त्यावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, हे वाक्य पहिलं संजय राऊत यांनी आपल्या मालकाला सांगावं. जो नियम त्याचा मालक म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)त्यांच्या मुलाला लावतात, तो नियम अन्य शिवसैनिकांना कधीच लावला नाही. संजय राठोड (Sanjay Rathore)यांना ज्या कारणामुळे राजीनामा द्यायला लावला, तसा आदित्य ठाकरेंचा राजीना का घेतला नाही, असा सवालही केला. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही(Uddhav Thackeray) निशाणा साधला.(Nitesh Rane Criticize On Uddhav Thackeray saamna sanjay raut aditya thackeray )
पवारांनी मंत्री, पालकमंत्री वाटपही केले होते…; मुनगंटीवार यांचा मोठा दावा
महाविकास आघाडीची सत्ता असताना तुझा मालक मुख्यमंत्री असताना, आमदार संजय राठोड यांना एका महिलेच्या घटनेवरुन राजीनामा द्यायला लावला. आता तोच आरोप आदित्य ठाकरेवर आहे. दिशा सालियन हत्येचा आरोप आदित्य ठाकरेवर आहे. मग जो नियम संजय राठोड यांना लावला तोच नियम आदित्य ठाकरेला का लावला नाही, असा सवालही यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. त्या ठिकाणी समान नागरी कायदा का आणला नाही. दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा हा सल्ला हा सल्ला आपल्या मालकाला द्यावा असा टोलाही यावेळी राणे यांनी खासदार राऊत यांना लगावला आहे.
ODI World Cup 2023: वर्ल्डकपमुळे बॉलीवूडला बसणार जबर फटका ! पाहा कोणते आहे ते सिनेमा?
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना पहिले आदित्य ठाकरेंचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मगच अन्य लोकांचा राजीनामा घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना होता. समान नागरी कायद्यावर ठोस भूमिका घेण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बेईमानी केली आहे.
ज्या सेनाभवनला हिंदुत्वाचं मंदिर म्हणून प्रत्येकजण ओळखतो, हिंदुत्वाचं केंद्रबिंदू म्हणून वर्षानुवर्ष जे सेनाभवन राहिलेलं आहे. त्या सेनाभवनमध्ये मौलना उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी मुस्लीम लॉ बोर्डचे लोक भेटण्यासाठी आले होते.
आता मला संजय राजाराम राऊत आणि अन्य उद्धव ठाकरेंच्या सैनिकांना विचारायचंय की, तुम्ही बाळासाहेबांना आपलं दैवत मानता, ज्या सेनाभवनमध्ये हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना निर्माण केली, त्या ठिकाणी मुस्लीम लॉ बोर्डची लोकं वावरायला लागली तर सेनाभवनमध्ये गोमुत्र शिंपडून सेनाभवचं शुद्धीकरण करणार का? असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.
अगर जमत नसेल तर पहिले सेनाभवनवर असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून टाका आणि त्या ठिकाणी जो मशिदीच्या तिथे जो भोंगा लागतो तो, भोंगा लावून टाका आणि होउदे सुरु तीथं जे पाच वाजता, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटावर केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कारला दुचाकीचे धडक दिल्याची घटना काल शिवसेना भवनसमोर घडली होती. या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा तर हा प्रयत्न नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.