Chitra Wagh : “महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही” तुलना वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणल्या…

  • Written By: Published:
Chitra Wagh : “महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही” तुलना वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणल्या…

मुंबई : ‘मी कोणाचीच तुलना नाही केली. महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही’ अस म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कालपासून सुरु असलेल्या वादावर सारवासारव केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून त्यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या की “मला आश्चर्य वाटतंय आहे की, कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरून वादंग निर्माण केला जात आहे. काल हळदी कूंकूचा कार्यक्रम होता. पण माझे स्वागत करताना मला पुरुषांनी औक्षण केले. काल पाच पुरूषांनी माझे औक्षण केले दादा म्हणाले की, तुम्ही भगिणी नेहमी आमचे यश चिंतन करता आता पुरूषांनी पण हे भगिणींसाठी केले पाहिजे.” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या ?

काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ म्हणल्या की “काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube