जयंत पाटलांच्या नेतृत्वात ‘हा’ गैरव्यवहार, पडळकरांचा आरोप

  • Written By: Last Updated:
जयंत पाटलांच्या नेतृत्वात ‘हा’ गैरव्यवहार, पडळकरांचा आरोप

नागपूर : ‘महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलं. त्यामध्ये सांगली जिल्हा हे सहकाराचं केंद्र होतं. तर सांगली जिल्हा बँक सामान्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करत होती. पण गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेमध्ये सत्ता आल्यानंतर त्या बँकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यावहार झाले आहेत. नोकर भरतीचा प्रचंड मोठा घोटाळा या बँकेत झाला. अनियमित कर्जवाटप करणे, मॉर्गेज न घेणे, अधिकारात बसत नसतानाही कर्जमाफी करणे. असे अनेक गैरव्यवहार या बँकेतून करण्यात आले आहेत.’

‘त्यामुळे या बँकेच्या चौकशीची मागणी आत्ताच्या विद्यमान जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी केली होती. मागच्या सरकारने व्यक्त करण्याची चौकशी देखील सुरू केली. मात्र एका पत्राद्वारे चौकशी स्थगित करण्यात आली. सांगली जिल्हा बँक राजकारणाचा अड्डा झालाय. त्यामुळे सरकारकडे जिल्हा बँकेची चौकशी पूर्ण सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता सहकार मंत्र्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चुकीचे काम केले आहेत. ते समजना तसेच त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जाईल. असं मला विश्वास आहे.’ असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राज्यात सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा सत्ता आल्यानंतर या बॅंकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार झालेले आहेत. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळात आक्षेपार्ह शब्द वापरल्या प्रकरणी त्यांचं निलंबन करण्यात आले होते.
B

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube