मुंबई : ‘खासदार व मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने आपल्या घरामध्ये धारधार शस्त्र, चाकू ठेवा जेणेकरून आपल्याला कधीही ते वापरता आले पाहिजे असे विधान केले आहे. खरंतर तीच्यासारखे सगळ्यांनी बॉम्ब स्फोटाचेही प्रशिक्षण घ्यायला हवं. ते ठेवण्याचेही प्रशिक्षण घ्यायला हवं. घरात फक्त चाकू नाही तर RDX,मशीनगन, स्टेनगन, एके 47, रिव्हालवर सगळच ठेवा. कारण […]
नागपूर : सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकार आक्रमकपणे पावले टाकत आहे पण याउलट महाराष्ट्र सरकार आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर सीमाभागातला मराठी ठसा पुसला जाईल, अशी भीती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. ते आज नागपुरात विधीमंडळ अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठराव संमत केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव […]
नागपूर : कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, भालकी, कारवार या शहरांसह सर्व 865 मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्याचा ठराव विरोधकांच्या दबावामुळे उशीरा का होईना आणल्याबद्दल सरकारचे आणि तो एकमताने मंजूर केल्याबद्दल विरोधी पक्षांचे मनापासून आभार!, हाच ठराव ज्या वेगाने यायला पाहिजे होता, त्या वेगाने आला नाही आणि सरकारकडून जी आक्रमकता दाखवायला पाहिजे होती ती दाखवली गेली […]
नागपूर : ‘विरोधी पक्षाच्या रेट्यापुढे सत्ताधारी पक्ष झुकला. कर्नाटक सीमावादावर विधानभवनात एकमताने ठराव मंजूर. सीमाभागातील बांधवांच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच बेळगाव,निपाणी,कारवार,बीदर,भालकीच्या इंचनइंच जागेवर महाराष्ट्राचा हक्क असल्याचा ठराव सदनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधीमंडळात […]
नागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 अंतर्गत पात्र ठरलेल्या 111 उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी […]
अहमदनगर : मंत्री चंद्रकांत पाटलांचे पुतळे जाळले असते तर काही नाही, मात्र, शाईफेकणं हिंसक वाटत, असल्याचं मत युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे. लेट्सअपशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले, महाविद्यालयीन जीवनापासून मी आंदोलनातच आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने मला सांगितलं की, तुझं चार वर्षांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आठ वर्षांत पूर्ण […]