काष्टी ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरूच; नवनिर्वाचित दहा सदस्यांचे राजीनामे

काष्टी ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरूच; नवनिर्वाचित दहा सदस्यांचे राजीनामे

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आठवडा होत आला तरी तेथील राजकीय नाट्य काही थांबताना दिसत नाही. काल (गुरुवारी) उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक झाली.

यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटातील एक सदस्य फटल्याने साजन पाचपुते गटाचा उमेदवार उपसरपंच झाला. त्यामुळे नाराज झालेल्या बबनराव पाचपुतेंच्या गटातील सर्व दहा ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत उपसरपंच पदासाठी बबनराव पाचपुते यांच्या गटाचे स्पष्ट बहुमत असताना एक सदस्य फुटला. त्यामुळे आमदार पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे. उपसरपंच हा साजन पाचपुते यांच्या गटाचा झाला.

बबनराव पाचपुतेंच्या गटातील कोणता सदस्य फुटला हे कळण्यास मार्ग नसल्याने त्यांच्या गटातील दहाही सदस्यांनी प्रतिज्ञापत्र देत आपले राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांचेकडे सुपूर्त केले आहेत.

बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा पराभव करत साजन पाचपुतेंनी सरपंच पद मिळविले. त्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार पाचपुतेंच्या गटातील सदस्य फोडत उपसरपंचपदही आपल्याच गटाचा करण्यात यशस्वी ठरले. हे बबनराव पाचपुतेंसाठी मोठे राजकीय धक्के जमजले जात आहेत.

राजीनामे देणाऱ्या सदस्यांत अश्विनी जितेंद्र पाचपुते, अलका शांताराम राहिंज, सुरज राहिंज, रेश्मा वसंत पाचपुते, सुभाष जयसिंग पाचपुते, संध्या आजिनाथ कोकाटे, कामिनी अनिल पवार, दादासाहेब गोरख कोकाटे, महेश दिलीप दरेकर, तनुजा शिवाजी गवळी यांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube