पहाटेच्या शपथविधीवरील स्टेटमेंटवर प्रकाश आंबेडकरांनी Jayant Patil स्पष्ट शब्दांत सुनावलं

पहाटेच्या शपथविधीवरील स्टेटमेंटवर प्रकाश आंबेडकरांनी Jayant Patil स्पष्ट शब्दांत सुनावलं

मुंबई : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही जर निवडणूक टाळण्यासाठी जर हा ड्रामा करत असाल तर त्यापेक्षा सरकार पडू द्याच होत, आणि शिवसेनेशी (Shiv sena) युती करायची होती. सरळ मार्ग सोडून उलट्या मार्गानी खायची काय गरज होती, हे फक्त असं की ट… ला ठ जोडणं आणि फ्…ला फ यावरून एक नवीन कविता करणं अशा रीतीचा हे विधान असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं.

माझं पूर्वीपासून मत आहे, शरद पवार हे भाजपचे आहेत. तुम्ही डोळे झाकून चालला आहात, पण माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं आंबेडकर यांनी म्हटलं होतं. तसंच आपली युती ही ठाकरे गटासोबत आहे, महाविकास आघाडीसोबत नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि आजित पवार यांनी 2019 ला पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसेच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube