प्रमोद तिवारी यांची राज्यसभेत उपनेतेपदी निवड, रजनी पाटील यांच्याकडेही मोठी जबाबदारी

Untitled Design   2023 03 12T145407.787

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने शनिवारी प्रमोद तिवारी (Pramod Tiwari) यांची पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील (Rajni Patil) यांची राज्यसभेतील पक्षाच्या व्हिप म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली. कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यसभेतील आनंद शर्मा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून सभागृहात काँग्रेसचा एकही उपनेता नव्हता. त्यामुळे आता राज्यसभेत कॉंग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची निवड करण्यात आली. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड(Jagdeep Dhankad) यांनी या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे नेते म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षाचे नेते आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील पक्षाचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी आणि व्हीप म्हणून रजनी पाटील यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. या नियुक्त्यांची माहिती राज्यसभेच्या अध्यक्षांना देण्यात आली आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

काँग्रेस नेते प्रमोद तिवारी हे तब्बल तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते माजी कॅबिनेट मंत्री देखील राहिले आहेत. तर रजनी पाटील या महाराष्ट्रातून दोन वेळा राज्यसभेवर खासदार आहेत. राज्यसभा गटनेतेपदी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिाकार्जुन खर्गे हेच तूर्तास कायम आहेत. कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपद खर्गे यांच्याकडे आल्यानंतर राज्यसभेतला गटनेता बदलला जाईल, अशी चर्चा होती. पण, तूर्तात गटनेतेपदात कोणताही बदल झाला नाही. तर रमेश हे मुख्य व्हिपची भूमिका बजावतात.

Virat Kohli Century : विराटने कसोटी क्रिकेटमध्ये दिर्घकाळानंतर ठोकलं शतक

दरम्यान, 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसने या नियुक्त्या केल्या आहेत. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात रजनी पाटील यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. सभागृहाच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर आता पाटील यांच्यावर कॉंग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube