राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपात प्रशांत किशोरांची उडी; म्हणाले, ‘पेगॅसस’ प्रकरणात माझाही फोन टॅप झाला होता!

Prashant Kishor On Phone Tapping: देशात फोन टॅपिंग होणं ही आता नाकारता न येणारी गोष्ट असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

Prashant Kishor On Phone Tapping

Prashant Kishor On Phone Tapping: देशात फोन टॅपिंग होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप केल्यानंतर आता जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनीही यावर भाष्य केलं आहे. देशात फोन टॅपिंग (Phone Tapping) होणं ही आता नाकारता न येणारी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणात आपलाही फोन टॅप झाला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

सनी देओल आणि अजय देवगणसोबत माधुरीनं एकत्र केला होता डान्स, फराह खान म्हणाली, ‘तुला तर अवॉर्ड मिळायला हवा’

माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, देशात गेल्या काही काळापासून फोन टॅपिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना या वास्तवाची माहिती असणं गरजेचं आहे. पेगॅसस स्पायवेअरच्या (हेरगिरी सॉफ्टवेअर) माध्यमातून हेरगिरी होत असल्याचा मुद्दा समोर आला होता, त्यावेळी आपलं नावही संबंधित यादीत असल्याचं त्यांना समजलं होतं. त्या काळात आपला फोन टॅप केला जात असल्याची माहिती मिळाल्याचंही किशोर यांनी सांगितलं.

पेगॅसस प्रकरण समोर आलं, तेव्हा प्रशांत किशोर निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत होते. त्यांच्या या विधानामुळे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंगच्या मुद्द्याला आता आणखी एक राजकीय संदर्भ मिळाला आहे.

नेमका वाद काय आहे?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ या संवादात्मक सत्रात त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना जाहीर चर्चेचं आव्हान दिलं.

Muffler History : रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ ची चर्चा; पण, मफलरचा प्रवास कसा?

संसदेत चर्चा करण्याऐवजी जाहीर चर्चेचा आग्रह का धरता, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी संसदेत आपल्याला मोकळेपणाने बोलू दिलं जात नसल्याचं सांगितलं. आपला माइक बंद केला जातो, असाही दावा त्यांनी केला. सरकारविरोधातील आरोपांचे पुरावे आपल्या मोबाईलमध्ये असून, तो फोन पंतप्रधानांकडून टॅप केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा केला.

Tata Sons IPO : टाटा समूहाची लिस्टिंग झाल्यास इतिहास बदलणार? नोएल टाटा यांनी व्यक्त केली मोठी चिंता

आता प्रशांत किशोर यांनीही पेगॅसस प्रकरणाचा उल्लेख करत फोन टॅपिंगवर भाष्य केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला आणखी धार आली आहे.

follow us