Pune : चंद्रकांतदादा पाटील कसब्यात ठाण मांडून

Pune : चंद्रकांतदादा पाटील कसब्यात ठाण मांडून

पुण्यातील कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection )  प्रचार शिगेले पोहोचला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak )  यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil )  हे कसबा मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. अनेक कार्यकर्त्यांचा बैठका ते घेत आहेत.

कसबा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी गिरीश बापट हे सलग पाच वेळा निवडूण आले आहेत. 2019 साली त्यांच्या जागेवर मुक्ता टिळक या निवडणून आल्या होत्या. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवीवार पेठ येथे बैठक घेतली आहे.  या बैठकीत प्रचाराचे नियोजन, तयारीची सज्जता, बूथ सशक्तीकरण या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ आदी नेते मंडळी उपस्थित होती. तसेच आजी-माजी नगरसेवक देखील या बैठकीसाठी उपस्थित होते.

या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने नवीन निवडणूक कार्यालय देखील सुरु केले आहे. दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘मोदी @ 20’  या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन होणार आहेत. यावेळी शाह हे निवडणूक प्रचारात सहभागी होणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.  पण त्यांच्या पुणे दौऱ्यामुळे ही निवडणूक आणखी गाजण्याची शक्यता आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube