Radhakrishna Vikhe Patil : सत्यजीत तांबे यांना अर्ज भरण्यासाठी थोरातांचा आग्रह होता?

Radhakrishna Vikhe Patil : सत्यजीत तांबे यांना अर्ज भरण्यासाठी थोरातांचा आग्रह होता?

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आहे. काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यासाठी आलेल्या सत्यजीत तांबे यांनी निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी नाकारणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर खरमरीत शब्दांत टीका केली.

सत्यजित तांबे यांच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांच मौन. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस का सोडली, उमेदवारी करावा म्हणून मामाचा आग्रह होता का ? काँग्रेसच्या निष्ठा आणि इतर बाबतीत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अनेकदा ज्ञान पाझळलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरात घेतली पाहिजे, असा टोला विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) लगावला आहे.

शुभांगी पाटील यांच्याबद्दल विचारले असता विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक उमेदवार आपला पर्याय शोधत असतो. महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी उमेदवार शोधलाय. उद्या भाजपाने सत्यजित तांबेना पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे विखे म्हणाले.

पक्षाच्या विचाराशी फारकत घेऊन काँग्रेसची (Congress) वाटचाल सुरू आहे. भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी नव्हे तर राहुल गांधींसाठीच असून स्वतःची छबी वाढवण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आलाय. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची अशीच अवस्था आहे. सुजय विखें प्रमाणेच सत्यजित ही बाहेर पडेल असं मला वाटतंय असे वक्तव्य करत विखे पाटलांनी पदवीधरसाठी सत्यजित तांबेंच भाजपचे (BJP) उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube