Download App

वीस वर्षे झाली राज लालबुंदच : उद्धव आणि शिवसेनेवरचा राग जाईना

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल गुढीपाडवा मेळवा (MNS Gudhi Padawa Melava) पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माहीम (Mahim Dargha) येथील दर्ग्यावर भाष्य केल्यानंतर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मात्र, गुढीपाडवा मेळाव्यात राज यांना नक्की काय सांगायचं आहे, त्यांच्या बोलण्यात वैचारिक गोंधळ होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालच्या मेळाव्यानंतर गेल्या 20 वर्षानंतरही राज ठाकरे यांचा अजेंडा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि शिवसेनाच राहिला आहे का? असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक

कालच्या मेळाव्यात राज यांनी मी आज जे काही बोलणार त्यावर परत उत्तर नको नाही तर, मी आतलं बाहेर काढेल असा गर्भित इशारा राज यांनी दिला. त्यांचं हे विधान एकप्रकारची धमकीचं आहे. मी आरोप करेल किंवा खरं सांगेल पण, त्यावर तुम्ही तुमची बाजू मांडायची नाही ही कुठली भूमिका? असा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित केला जात आहे. जर आपली बाजू खरी असेल असं राज ठाकरेंना वाटतं तर, दुसरी बाजू समोर यायला काय अडचण आहे? नारायण राणे, (Narayan Rane) रामदास कदम यांच्या सभा आणि पत्रकार परिषदा पाहिल्या तर, मी आतलं बाहेर काढेल हे वाक्य ब्रँड झालयं का? असा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होत आहे. राज ठाकरे, राणे, कदम यांच्यानंतर आता अनेक गोष्टी बाहेर काढेल हे वाक्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यादेखील बोलण्यात सातत्याने येऊ लागली आहेत.

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांनी मनसेची स्थापना केली. राज ठाकरेंनी नवं महाराष्ट्र आणि नवं निर्माणाचं स्वप्न दाखवलं, यासाठी त्यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल हे दाखवणारी ब्लू प्रिंटदेखील काढली, त्यांच्या या भूमिकेनंतर जन सामान्यांनी त्यांना भरभरून साद देत नाशिक महापालिकेत सत्ता मिळवून दिली. एवढेच काय तर, कल्याण -डोंबिवली आणि मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून दिले. त्यानंतरही आपल्याला मुंबई डान्सबार झाल्यासारखी वाटते असे राज म्हणतात. मात्र, दुसरीकडे नाशिक असो किंवा केडीएमसी असो येथे विकास करण्यासाठी मनसेने कोणती ठोस भूमिका, प्रयोग केले आणि ते किती यशस्वी झाले याचं उत्तर आजही अनुत्तरीत आहे.

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

आपल्या स्वतःला आणि नारायण राणेंना शिवसेना सोडून जायचे नव्हते असा गौप्यस्फोटदेखील राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात केला. त्यांच्या या विधानानंतर राज आणि राणे यांना शिवसेनेची म्हणजेच (सध्याचा ठाकरे गटाची) ताकद आणि अस्तित्त्व मान्य आहे हे अधोरेखित होते. पक्षातून बाहेर पडल्यानंतर राणे आणि राज यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षांची स्थापना केली. दोन्ही नेत्यांची स्वतःची ताकद बघता त्यांनी त्यांच्या पक्षांना एका नव्या उंचीवर नेणे अपेक्षित होते परंतु, तसं झालं नाही. त्याऐवजी मनसेच्या झेंड्यात अनेक रंग टाकल्याचे तसेच हे सर्व रंग जाती धर्माच्या पलीकडे असल्याची भूमिका राज ठाकरेंची होती. मात्र, मागे वळून पाहताना राज यांचा प्रवास मराठी माणूस, हिंदुत्व आणि आता धर्माभिमानी हिंदुत्व असा होतो. त्यामुळे राज यांना नेमकं कुठे आणि कसा प्रवास करायचा आहे हे इतक्या वर्षांनंतरही उमगलेले नसल्याचे दिसून येते.

त्यात ज्या मुस्लिमांनी 2009 मध्ये मनसेला भरभरून मत दिली त्याच मनसेला आता फक्त जावेद अख्तर यांच्यासारखे उच्चविभूषित मुस्लिम हवे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे जावेद अख्तर यांचा व्हिडीओ दाखवायचा आणि दुसरीकडे माहीममध्ये दर्गा होतोय म्हणून तो तोडा नाहीतर मी शेजारी गणपती मंदिर उभारेल अशी परस्पर विरोधी भूमिका घ्यायची हे काहीसे दिशा चुकविणारेच असल्याचे वाटते.

काय बोलावं काय भूमिका घ्यावी हा राज यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र, तब्बल 20 वर्षांनंतरही जर ठोस असं काही होत नसेल तर, जनतेनेही त्यांना नेमकं काय हवे आहे हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या बदलेल्या भूमिकेनंतर तरी राज त्यांची ठोस अशी दिशा ठरवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us