अमृता फडणवीसांच्या ‘फिरकी’वर राज ठाकरेंचे ‘षटकार’, डोळा मारणे, टाळी देण्यावर….

  • Written By: Published:
Raj And Amruta

Raj Thackeray Interview : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि बँकर, समाजसेविका अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत झाली. त्यात अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यावर राज ठाकरे यांनी जोरदार उत्तर देत फटकेबाजी केली.

राज ठाकरे म्हणाले, मी आता तो विषय बंद करुन टाकलाय

अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारताना खासदार संजय राऊत यांनाच डिवचले आहे. काही नॉटी लोक सकाळीच माध्यमांवर खालच्या स्तरावर राजकीय टीका करतात, यावर काय केले पाहिजे, असा प्रश्न राज यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मी याबाबत अनेकदा माध्यमांच्या प्रतिनिधींशी, संपादकांशी बोलले आहे. परंतु त्यांच्या टीआरपीचे काही करू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांच्या समोर आता भाजपचे राणे अस्र

अमृता फडणवीस यांनी लगेच राजकारणात टाळी देणे, डोळा मारणे, गळा भेट घेण्याचा प्रश्न विचारला. राहुल गांधींनी मोदी यांची गळाभेट घेऊन डोळा मारला. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात माईक देत डोळा मारला, यावर तुमचा काय प्लॅन आहे, पुछँता है महाराष्ट्र असा प्रश्न अमृता फडणवीसांनी विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी डोळ्या मारायचा का असे मिश्किल उत्तर दिले. ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या आहेत. त्या राहून गेल्या असतील त्या आता करत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

तुम्ही कधी राष्ट्रवादीजवळ, शिवसेना, कधी भाजपजवळ जाता. तुम्ही कधी टाळी देता, असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज यांच्यावर सोडला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाबरोबर आहे. तेही कळतच नाही. पहाटे गाडी घेऊन ते कुठे तरी जातात. तुम्हाला पत्ता नसतो. कधी शिंदेबरोबर आहेत. तर कधी अजित पवारांचा पहाटेचा चेहरा पडलेला असतो, असे टोमणेदार उत्तरही ठाकरे यांनी दिले. राजकारणातील एकमेंकाना भेटण्याचा मोकळेपणा माध्यमांनी घालवला असल्याचे ठाकरे म्हणाले.

Tags

follow us