Rajan Vichare : हल्ले थांबले नाहीत तर जशास तसे उत्तर देऊ…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (59)

ठाकरे गटाचे ( Thakarey Camp)  नेते व ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare ) यांनी शिंदे गटावर मोठा आरोप केला आहे. आमच्या शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला देखील करण्यात येत आहे, असा आरोप विचारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

यानंतर राजन विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यातील काही शाखांचे उद्घाटन हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. या शाखा बांधणारे आमचे शिवसैनिक देखील दिवंगत झाले आहेत. परंतु पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शाखा बळकावण्याचे काम चालू आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना अशा प्रकारचे कृत्य करणे, हे योग्य नाही, असे विचारे म्हणाले आहेत. तसेच आमचे नेते संजय राऊत यांचे पोलिस संरक्षण देखील काढण्यात आले आहे. जर या घटना थांबल्या नाहीत तर जशाच तसे उत्तर देऊ, असा इशार त्यांनी दिला आहे.

दरम्यान  निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह असलेले धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिले आहेत. त्यामुळे आता शिंदे समर्थक हे वेगवेगळ्या ठिकाणच्या असलेल्या शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाने विधीमंडळातील शिवसेनेचे कार्यालय हे देखील आपल्या ताब्यात घेतले आहे. परंतु आता या मुद्द्यावरुन राज्यभरात तणाव पहायला मिळतो आहे. काही ठिकाणी शाखा ताब्यात घेण्याचा वादावरुन हाणामारी देखील झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube