विखेंशी पंगा घेण्याचे अनेकजण टाळतात… पण राम शिंदे थेट भिडतात ! ही आहेत कारणे…

  • Written By: Published:
विखेंशी पंगा घेण्याचे अनेकजण टाळतात… पण राम शिंदे थेट भिडतात !  ही आहेत कारणे…

Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe : राधाकृष्ण विखे पाटील हे नगर व राज्यातील राजकारणातील मोठे नाव. काँग्रेसमध्ये असताना त्यांचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात जोरदार खटके उडत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे एकमेंकाच्या कायम तक्रारी व्हायच्या. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले. मुलगा खासदार ते महसूलमंत्री झाले. जिल्ह्यात विखेंशी पंगा घेणे अनेक जण टाळतात. पण माजी पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांचे विखेंशी जोरदार खटके उडत आहेत. त्याचे काय कारणे आहे ते जाणून घेऊया.

अहमदनगर : बाळासाहेब थोरातांचे भाचे होणार अजित पवारांचे कान, नाक अन् डोळे…

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत सुजय विखे हे भाजपमध्ये आले आणि खासदार झाले. त्याचपाठोपाठ राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण दोन्ही भागात त्यांचे राजकीय वजन आहे . त्यामुळे भाजपला फायदा होईल, असे पक्षनेतृत्वाला वाटत होते. पण विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्यासह मोनिका राजळे, बबनराव पाचपुते हे तिघेच निवडून आले. कोपरगाव, अकोले, राहुरी, कर्जत-जामखेड, नेवासा येथील भाजपचे विद्यमान आमदार पराभूत झाले. विखे नसताना जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार होते. जिल्हा भाजपमय होता. विखे आल्यानंतर विखेंसह तीनच उमेदवार निवडून आले. विखेंमुळे उमेदवार पडल्याचा आरोप राम शिंदे, शिवाजी कर्डिलेंसह इतरांनी केला. त्यात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार झाली. त्याची चौकशी झाली पण पुढे काहीच झाले नाही.

फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला

महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने वाद थंड झाला होता. फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले राम शिंदे हे विधानपरिषदेवर गेले. त्यानंतर भाजप-शिंदे गट अशी सत्ता आल्यानंतर राधाकृष्ण विखे यांना दोन नंबरचे महसूलमंत्रीपद मिळाले. दुसऱ्या पक्षातून आलेल्या विखेंना भाजपने मोठे पद दिले. याबाबत भाजपच्या काही नेत्यांमध्ये खदखद आहे. त्यात विखे पिता-पुत्र हे उत्तर व दक्षिण दोन्ही भागात आपल्या जुन्याच सहकाऱ्यांना पाठबळ देतात. त्यामुळे स्थानिक भाजपचे नेते नाराज आहेत. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. नगर शहरात तर भाजपने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना कायम विरोध केला. पण खासदार सुजय विखे हे त्यांच्याबरोबर राजकीय कार्यक्रमात कायम एकत्र असतात. तेही मूळ भाजपवासीयांना खटकत आहे.

मध्यंतरी राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यात काही आमदारांना विखेंना समर्थन दर्शविण्यास सुरुवात केली. त्यावर शिंदे यांनी विखेंना डिवचले आहे. विखे आताच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना भाजप समजू घ्यायला वेळ लागेल, असे शिंदे म्हणाले. गेल्या महिन्यात राम शिंदे यांनी लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. आता थेट जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत विखे-पिता पुत्र व शिंदेंचा संघर्ष पुन्हा उघडकीस आले. बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवारांना विखेंनी मदत केल्याचा गंभीर आरोप राम शिंदेंनी विखेंवर केला. तशीच याची तक्रार राज्यातील पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत भेटले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये विखेंची थेट व्हॉटलाइन तयार झाली आहे. त्याचाही धोकाही राज्यातील काही भाजप नेत्यांना वाटत आहे. राम शिंदे हे फडणवीस यांच्या जवळचे आहे. शिंदे हे थेट विखेंवर आरोप करत असल्याने त्यांना भाजपमधील काही राज्यातील नेत्यांची साथ असल्याची राजकीय चर्चा आहे.

विखे हे सुद्धा राम शिंदेंवर थेट टीका करत नाहीत असे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र भविष्यात विखे थेटपणे पलटवार करणारच नाहीत असे पण नाही. विखेंवरील आरोपांचे पक्ष दखल घेईल की हेही पेल्यातील वादळ ठरेल हे येत्या काळात समजेलच.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube