Ram Shinde : शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, राम शिंदेंची घणाघाती टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (55)

भाजपचे ( BJP )  नेते व माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde )  यांनी शरद पवारांवर ( Sharad Pawar )  थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, असा आरोप त्यांनी पवारांवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवर ( Sanjay Raut ) देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे शकुनी मामा आहेत, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते हे भाजपवर शिवसेना फोडल्याचा आरोप करत असतात. भाजपने खोके देऊन आमदार फोडले, असा आरोप भाजपवर ठाकरे गटाचे नेते करत असतात. त्यावर भाजपचे नेते राम शिंदे यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली. छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते आता राष्ट्रवादीत असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याआधी राऊतांनी शरद पवारांना विचारावे, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.

तसेच पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीनेच झाला आहे. त्याशिवाय शरद पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, असा टोला देखील त्यांनी लगावला. याशिवाय ठाकरे गटाचे नेते संजय राऊतावंर देखील त्यांनी निशाणा साधला. संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. त्यांनी शिवसेनेमध्ये राहून राष्ट्रवादीचे काम केले, अशी टीका शिदेंनी राऊतांवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube