Ram Shinde ; तथ्य नाही म्हणता मग स्पष्टीकरण द्यायला इतके दिवस का लागले?

Ram Shinde ; तथ्य नाही म्हणता मग स्पष्टीकरण द्यायला इतके दिवस का लागले?

Ram Shinde on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या स्पष्टीकरणावर भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी संशय व्यक्त केला आहे. माध्यामांत सुरु असलेल्या चर्चेत तथ्य नाही म्हणायला अजितदादांना इतके दिवस का लागले? असा सवाल राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे.

राम शिंदे म्हणाले की, अजितदादा परखड बोलणारे नेते आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी सांगितले की माध्यामांत सुरु असलेल्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही. पण ज्यावेळी अशाप्रकारच्या चर्चा सुरु असतात त्यावेळी कुठंतरी तथ्य असतं. परंतु त्यांनी तथ्य नाही म्हटले असले तरी तथ्य नाही म्हणायला इतके दिवस का लागले? राज्य आणि देश पातळीवर या बातम्या येत आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रश्न आहेत. त्याचे उत्तर मिळालेले नाही. त्यांच्याकडून उत्तर मिळणे अपेक्षित आहे.

विनोद तावडे समितीचा अहवाल म्हणूनच राज्यात राजकीय “उलथापालथ”; काय होत अहवालात?

दरम्यान अजित पवार म्हणाले की कोणीही काळजी करु नये. आम्ही सर्वजण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आजवर पक्षामध्ये अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. पक्षातच राहणार आहोत बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.

कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण झाले आहे. काही नेतेमंडळींनी देखील अशा अफवा पसरवण्याचे काम केले आहे. तसेच सध्या माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube