Ravindra Dhangekar : फडणवीसांविषयी केलेल्या ‘त्या’ विधानावर धंगेकर पुन्हा बोलले

Ravindra Dhangekar :  फडणवीसांविषयी केलेल्या ‘त्या’ विधानावर धंगेकर पुन्हा बोलले

पुणे : कसबा ( Kasaba )  विधासभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही, असे विधान केले होते. यावरुन बराज राजकीय वादंग उठला होता. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा भाष्य केले आहे.

मी फडणवीस यांच्याएवढा मोठा नेता नाही. पण मी गेली ३० वर्षे राजकारणामध्ये आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे, शंकरराव चव्हाण या पिढीने महाराष्ट्राला एक दिशा दिली आहे. मी त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नेता नाही. पण आता कुरघोडीचे राजकारण होते आहे, असे ते म्हणाले आहेत.

अजितदादांचा शब्द, ‘सभागृहात आवाज उठवणार’; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

दोन वर्षांपूर्वी कोरोना आला. तेव्हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. पण ज्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडले नाही. शेतकरी, कामगार कुणालाही ते आवडले नाही. पुर्वीचे नेते असे कधी वागले नाही. राजकारणात काम करताना सत्तेत नसताना पण लोकांनी नमस्कार केला पाहिजे. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्ता नसताना कुणीही नमस्कार करणारे नसतील तर त्याचा काय उपयोग, असे धंगेकर म्हणाले आहेत.

या निवडणुकीत पोलिस, निवडणूक आयोग एवढेच नाही तर गुंडांची मदत घेण्यात आली. एका पद्धतीने हुकूमशाही पद्धत अवलंबण्यात आली. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पैशाची पाकिटे सापडली, असा आरोप धंगेकरांनी केला आहे.

Ravindra Dhangekar : विजयानंतर पवारांनी धंगेकरांना काय सांगितले?

दरम्यान कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी  भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवजणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube