Anand Dighe : “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे” आनंद दिघेंच वाक्य टाकून मनसेकडून आदरांजली

  • Written By: Published:
Anand Dighe : “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे” आनंद दिघेंच वाक्य टाकून मनसेकडून आदरांजली

मुंबई : शिवसेना नेते आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियावरून राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांचा एक फोटो शेअर करत आदरांजली वाहिली आहे. या पोस्ट मध्ये फोटोसोबत वर एक कॅप्शन लिहले आहे. यात “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.” असं लिहलं आहे.

“राजसाहेब, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे… तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य आहात… तुम्ही मराठी माणसाची ताकद आहात.” – स्व. आनंद दिघे असं कॅप्शन लिहून हा फोटो शेअर केला आहे.

आनंद दिघे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती त्यानिमित्ताने टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजन विचारे यांच्याकडून शिंदे गटावर टीका

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित प्रसारित केली आहे. या चित्रफितीत त्यांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube