शेवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी मारली बाजी?

शेवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी मारली बाजी?

अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच जिल्ह्यातील काही तालुक्यातील निकाल हाती आले आहे. यात शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीकडे 8, भाजपाकडे 3 तर जनशक्तीकडे 1 सरपंचपद गेले आहे. सरपंचपदाची जनतेतून निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.

शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. जनतेतून सरपंचपद निवडण्यात येणार असल्याने कोण विजयी होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये राष्ट्रवादीकडे 8, भाजपाकडे 3 तर जनशक्तीकडे 1 सरपंचपदावर विजय मिळवता आला.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभुवाडगाव, खामगाव, रावतळे-कुरुडगाव, जोहरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी व दहिगावने या आठ ग्रामपंचायतीचे सरपंचपदावर विजय मिळवला. वाघोली, सुलतानपूर, अमरापूर येथील सरपंचपदावर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. तर आखेगाव सरपंचपदावर जनशक्ती विकास आघाडीचा विजय झाला.

राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार– ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव (प्रभुवाडगाव), विद्या अरूण बडधे (खामगाव), चंद्रकला नवनाथ कवडे (रावतळे-कुरूडगाव), स्नेहल रोहन लांडे (जोहरापूर), शितल मंगेश थोरात (खानापूर), मनिषा राजेंद्र आढाव (भायगाव), काकासाहेब मुरलीधर घुले (रांजणी), सुनिता देवदान कांबळे (दहिगाव-ने) असे आहेत.

भाजपाचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार– भालसिंग सुशमिता उमेश (वाघोली), सविता विजय फलके (सुलतानपूर), आशाताई बाबासाहेब गरड (अमरापूर) असे आहेत.

जनशक्ती आघाडीचे सरपंचपदाचे विजयी उमेदवार – आयोध्या शंकर काटे (आखेगाव) असे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube