पाचपुते-पवार संघर्षाचा नवा पायंडा; शरद पवार-अजित पवारांची भाषा रोहित पवारांच्या तोंडी

Rohit Pawar VS Vikram Pachpute : 2029 च्या निवडणुकीत पाचपुते कसे निवडून येतात, तेच पाहतो, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rohit Pawar And Vikram Pachpute

Rohit Pawar VS Vikram Pachpute : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. त्यावरून रोहित पवार यांना घेरण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदारही सरसावले आहेत. यात श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) हेही आहेत. या आरोपांच्या फैरी आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. पाचपुते यांना उत्तर देताना रोहित पवार यांनी थेट इशाराच दिला. 2029 च्या निवडणुकीत पाचपुते कसे निवडून येतात, तेच पाहतो, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.


शिवसेना चिन्हाच्या वादात सुप्रीम कोर्टाचे शिंदे गटाला थेट सवाल; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नांनी सुनावणीला वेगळं वळण

यापूर्वी असेच इशारे रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांनी अनेकदा विविध नेत्यांच्या बाबतीत दिले होते. रोहित पवारही यांचे वक्तव्यही त्याच पठडीतील असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड तालुक्याच्या लगतचा भाग आहे. त्यामुळे बारामतीच्या पवारांचे विशेष लक्ष या तालुक्यातील राजकारणात राहिले आहे. यातूच पवार-पाचपुते मैत्री व शत्रुत्वाचे अध्याय लिहिले गेले. आता या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हा सत्तासंघर्ष काय आहे आणि आता त्यात जोडल्या जात असलेला नवा अध्याय कोणता आहे.


Maharashtra Cabinet Decision : पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मिळणार नुकसान भरपाई; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांचे सरकार पाडत पुलोदचे सरकार स्थापन केले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील एक तरुण पुण्यातील युवा चळवळीत जोरदार भाषण करताना शरद पवारांच्या नजरेत आला. श्रीगोंदा या नव्या मतदारसंघात या युवकाला उमेदवारी देण्यात आली. आणि हा युवक आमदार झाला. त्या युवकाचे नाव होते बबनराव पाचपुते. पुढे बबनराव तालुक्याचे लाडके बबनदादा झाले. शरद पवारांनी त्यांना मंत्रिपदेही दिली. जनता दल, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय परिवर्तनांत पवारांनी त्यांना साथ दिली. मात्र, नंतर पाचपुते यांच्यात पक्षातील नेत्यांमुळे कटुता वाढत गेली. अखेर बबनरावांनी 2014 ला राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेल्या शरद पवारांनी बबनरावांना श्रीगोंद्याचा आमदार होऊ देणार नाही. असा चंगच बांधला. शरद पवार व अजित पवारांनी श्रीगोंद्यात सभा घेतल्या राजकीय वातावरण तापवत पाचपुतेंना आस्मान दाखवले.

शरद पवारांनी एखाद्या आमदाराला अथवा खासदाराला ठरवून पराभूत करण्याची ही एकमेव घटना नाही. अकोले येथील वैभव पिचड, साताऱ्याचे उदयनराजे भोसले, अहिल्यानगरचे डॉ. सुजय विखे पाटील अशी किती तरी उदाहरणे देता येतील. अजित पवारांनीही काकांप्रमाणेच सीताराम गायकर, वैभव पिचड, बबनराव पाचपुते, निलेश लंके यांना राजकीय दम दिला. आता तसाच दम आमदार रोहित पवार यांनी बबनराव पाचपुते यांचे पुत्र आमदार विक्रम पाचपुते यांना दिला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांना काटशह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील तरुण आमदारांना पुढं आणलं आहे. त्यापैकीच विक्रम पाचपुते हे एक. विशेषतः विद्यार्थी आंदोलनाच्या बाबतीच पाचपुते रोहित पवारांना रोखण्यासाठी पुढे आल्याचे दिसतात. त्यांनी सुरुवातीला सोशल मीडियातून पवार यांच्यावर टीका सुरू केली. हळूहळू टीका अधिक आक्रमक आणि वैयक्तिक होत गेली. त्यामुळे रोहित पवारही चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाचपुतेंना उत्तर देताना ते म्हणाले, मी ज्याला मित्र समजत होतो, ते आंदोलक विद्यार्थ्यांना अर्बन नक्सल म्हणत आहेत. आता 2029 मध्ये ते विधानसभेवर निवडून जाणार नाहीत, असा इशाराच रोहित पवारांनी दिला आहे. रोहित पवारांच्या या आक्रमक अवताराने पुन्हा पाचपुते-पवार सत्तासंघर्षाची आठवण ताजी केली आहे हे नक्की.

follow us