Rohit Pawar : सीतारामन यांना दिला अजित पवारांचा दाखला

Rohit Pawar : सीतारामन यांना दिला अजित पवारांचा दाखला

गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा, पण अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत, असे यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोदी सरकारला (government) खोचक टोला लगावला.

गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही (Nirmala Sitharaman) ‘सप्तर्षी’ वापरताना घेतला असावा. पण, अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा ‘सप्तर्षी’मध्ये दिसत नाहीत. केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ, या बाजू दिसतात.

परंतु, गत ७ वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही. तर, प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा. तरच अर्थव्यवस्थेला गती मिळणार का? करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढण्याठीही प्रयत्न करण्याची गरज होती, असं रोहित पवार यांनी म्हटलं. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत, याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube