‘…तर पवारांनी आझाद मैदानावर उपोषण करावं’; मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोतांचं आव्हान

  • Written By: Published:
‘…तर पवारांनी आझाद मैदानावर उपोषण करावं’; मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोतांचं आव्हान

Maratha Reservation : गेल्या काही दिवसापासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या आरक्षणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर या आंदोलनपुढं सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कबुल केलं. मात्र, अद्याप मराठा आरक्षण मिळालं नाही. अशातच आता रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली. शरद पवारांना आरक्षणाबाबद एवढं वाटत असेल तर त्यांनी उपोषणाला बसावं, असं खोत म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

आज माध्यमांशी बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना खरचं एवढंच वाटत असेल तर तर त्यांनी उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करावं, आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांचं आरक्षण घालवलं, आणि आता पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर मगरीचे अश्रू ढाळत आहेत, असा आरोप खोत यांनी केला.

‘आमचं आरक्षण त्यांन देऊ नका, अन्यथा…’, सरकारने जीआर काढल्यानंतर कुणबी समाज आक्रमक 

ते म्हणाले की, मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनीच मराठा समाजाला बरबाद केले आहे. 2004 मध्ये बापट आयोग कोणी स्थापन केला. बापट आयोगाने आरक्षण देता येणार नाही, असे सांगितले. तरी हा आयोग का मान्य करण्यात आला? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांची जात ब्राह्मण आहे. त्यामुळे विरोधक आपले खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही खोत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काल मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचीही विनंती करणारं सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आलं. दरम्यान, काल सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे वंशावळीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन मराठा समाजाला आरक्षण  देण्याचा निर्णय घेण्यात यावा, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube