Sanjay Raut : राऊतांनी शीतल म्हात्रेचं प्रकरण पुन्हा उकरलं; म्हणाले चुंबनासाठी…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 01T130943.979

Sanjay Raut on Devendra Fadanvis :   ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. संजय राऊतांना (Sanjay Raut) लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामध्ये एके ४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

या सगळ्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला आलेल्या धमकीनंतर मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयीची माहिती दिली आहे. पण त्यांनी या विषयाची चेष्टा केली. जेव्हा एखाद्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी अशा प्रकारची माहिती देतो तेव्हा तुम्ही त्याची चेष्टा करता. हा कोणता प्रकार राज्यामध्ये सुरु आहे. तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्यावर या राज्याची जबाबदारी आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना सुनावले आहे.

Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी!

महाराष्ट्रात एक चुंबनाचा प्रकार घडला तो तुम्ही फार सिरीयस घेतलात. त्या चुंबनाच्या प्रकरणावर तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमच्या ब्लॅकमेल प्रकरणावर एसआयटी स्थापन केलीत. नक्की तुमची कायदा व सुव्यवस्थेची प्रायोरिटी काय आहे ते पहा, असा निशाणा त्यांनी फडणवीसांवर साधला आहे.

मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

मी अजिबात सुरक्षा मागणार नाही. सरकारला गरज वाटली तर ते सुरक्षा देतील. मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या बाईला केंद्राची सुरक्षा देण्यात येते. हा मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube