Sanjay Raut : यांना जीवे मारण्याची धमकी, श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत देवेंद्र फडणवीसांना पत्र

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (47)

मुंबई : सध्या शिवसेनेत (Shiv Sena) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे, आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरच अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube