‘Narayan Rane पादरा पावटा’…; संजय राऊत यांनी पाठवली मानहानीची नोटीस
मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात हे प्रकरण तापत आहे. आणि हा वाद आता न्यायालयात (court) जाणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली. संजय राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे नारायण राणे म्हणाले होते. आता न्यायालयात नारायण राणे संजय राऊत यांच्या नोटीसला काय उत्तर देणार, ते पाहावे लागणार आहे.
२००४ मध्ये संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्याकरिता आम्ही पैसे खर्च केले. तसेच संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत देखील नाही, या वक्तव्यांवर संजय राऊत यांनी राणे याना नोटीस पाठवली आहे. याविषयी संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, माझे मतदार यादीत नाव नव्हते, हे नारायण राणे यांनी सिद्ध करावे. तसेच राज्यसभेत निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केलेत म्हणजे नेमकं काय केलं ? असे पैसे खर्च करणे म्हणजे अँटिकरप्शन अंतर्गत हे प्रकरण येतं, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला.
राणे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना चक्क पादरा पावट्याची उपमा दिली. राऊत म्हणाले होते की, तो पादरा माणूस आहे, आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख त्यांनी यावेळी केला. हा सर्वांना अरे तुरे करतो, हा कोण आहे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना अरेतुरे करत होता, पंतप्रधान मोदींना अरेतुरे, हे कोण आहेत, याची चौकशी करा, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.
यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, नारायण राणे यांचे सर्व दावे खोडून काढले. ते म्हणाले, नारायण राणे म्हणतात, मी संजय राऊत यांना खासदार केले. मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण होते ? मला खासदार शिवसेना प्रमुखांनी केले. नारायण राणे यांना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केले. आम्हाला सर्व पदे बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. तसेच २००४ मध्ये माझे नाव मतदार यादीत होते. माझे मतदार यादीत नाव नव्हते, हे ते खोटे आरोप आहे. मला आता याविषयी काय बोलायच नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे.