LIC चं कोट्यावधीचं नुकसान, सरकार म्हणतंय All Is Well…संजय राऊतांची जोरदार टीका

LIC चं कोट्यावधीचं नुकसान, सरकार म्हणतंय All Is Well…संजय राऊतांची जोरदार टीका

नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कारभारावर सतत टीका करणाऱ्या भाजप सरकारवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली. नेहरुंचा काळ असेल किंवा इंदिरा गांधींचा. या ६७ वर्षात एलआयसीचं एक रुपयाचं देखील नुकसान झालं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या काळात एलआयसीचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं, असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

अदानी (Adani) विरोधात काँग्रेस देशभर आंदोलन करत आहे. एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन होत आहेत. एलआयसीचं (LIC ) ५० हजार कोटीचं नुकसान झालं. जिंदगी के पहले भी, जिंदगी के बाद भी एवढा एलआयसीवर विश्वास होता. गेल्या ६७ वर्षात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नव्हतं, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

हा नेहरुंचा काळ असेल. इंदिरा गांधींचा काळ असेल, आता गेल्या 7 वर्षात 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हा जनतेचा पैसा आहे. तो डुबत गेला. तरीही सरकार म्हणतेय ऑल इज वेल. काही घडलंच नाही. हा निर्लज्जपणा आहे, असा जोरदार हल्ला राऊत यांनी यावेळी केला.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये आंही थोड्यावेळात आम्ही सर्वजण जमणार आहोत. अदानी प्रकरणावर कोणती दिशा घ्यायची हे ठरवणार आहोत. आम्ही संसदेच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहोत. अमृतकाळात हा महाघोटाळा आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं.

यावर आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कोणती भूमिका घ्यावी, यावर निर्णय घेणार आहोत. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य आहे, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube