Sanjay Raut : मोदी शाहांच्या मदतीने देश लुटणाऱ्या अदानींना साधी नोटीसही नाही; राऊतांचा हल्लाबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 08T140158.130

Sanjay Raut Attack On Central Government :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut )   यांनी केंद्र सरकार व भाजपवर ( BJP ) हल्लाबोल केला आहे. देशात फक्त विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. ज्यांंनी देश लुटला त्यांच्याविरोधात सरकार एक अक्षर देखील बोलत नाही आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांना आलेल्या विधानसभेच्या हक्कभंगाच्या नोटीसीवरही भाष्य केले.

सध्या देशामध्ये विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. काल देखील लालूप्रसाद यादव यांच्या घरी धाड टाकण्यात आली. मनिष सिसोदिया यांना अटक झाली. एवढे असताना गौतम अदानी यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. ज्यांनी मोदी व शाह यांच्या मदतीने संपूर्ण देश लूटला त्यांना साधी नोटीस देखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे असत्य व चुकीचे आहे, त्याविरोधात आम्ही उभे राहणार, असे म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी राऊतांनी त्यांना आलेल्या हक्कभंग नोटीसीवर देखील भाष्य केले. गेले दोन दिवस मी मुंबईच्या बाहेर होतो. विधीमंडळाला देखील दोन दिवस सुट्टी होती. आमच्या नेत्यांशी चर्चा करुन याला कसे उत्तर द्यायचे, हे मी ठरवेल, असे ते म्हणाले आहेत. तसेच मी विधीमंडळाचा अपमान केलेला नाही. मी एका विशिष्ट गटाला चोर म्हटले आहे आणि ते योग्य आहे. सर्व विधानभवनाला चोर म्हणने हे कधीच शक्य नाही.  त्यांना सध्या सर्व महाराष्ट्र चोर म्हणत आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Arvind Kejriwal : केजरीवाल यांची अशीही “गांधीगिरी”, आज दिवसभर करणार ध्यान, कारण…

दरम्यान महाराष्ट्रात भांग पिऊन काही जण सत्तेवर आले आहेत. त्यांची भांग उतरली की सत्ता जाईल, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत आणि राज्यातील जनता ही किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या जनतेने दाखवले आहे. त्यामुळे त्यांची सगळी भांग ही कसब्याच्या जनतेने उतरवली आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us