Sanjay Raut : बाळासाहेबांसमोर होता जनता पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आज कोल्हापूर येथे भाषण झाले. यावेळी त्यानी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना राऊतांनी शिवसेना पक्ष हा जनता पक्षामध्ये विलीन होणार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी त्याला नकार दिला, अशी आठवण सांगितली. ही आठवण सांगून त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
1975 मध्ये इंदिरा गांधी यांच्या विरोधात खुप मोटी लाट आली होती. तेव्हा सगळे विरोधी पक्ष इंदिरा गांधी व काँग्रेसचा पराभव करण्यासाठी एकत्र झाले. त्यावेळी शिवेनेच्या काही नेत्यांनी ठरवले की शिवसेना हा पक्ष जनता पक्षामध्ये विलीन करायचा. या नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना तसे सांगितले. आता पुढचे 25 वर्ष जनता पक्ष सत्तेत राहणार आहे. त्यामुळे जनता पक्षात आपण जाऊया, असे त्यावेळच्या नेत्यांनी बाळासाहेबांना सांगितले. आता फक्त शिवसेनेत चाकु आणि सुरीवालेच आहेत, असे तेव्हाचे नेते बाळासाहेबांना म्हणाले, असे राऊतांनी सांगितले.
Sanjay Raut : तुरुंगात गेलो, यांना काय घाबरायचं ?; हक्कभंगाच्या गदारोळावर राऊतांनी सुनावले
यावर बाळासाहेबांनी त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. तुम्हाला जायचे तर तुम्ही जा. मी एकटा इकडे राहील. हे जे पाच-दहा चाकू सुरेवाले आहेत, त्यांनी घेऊन मी पुढे जाईल, अशा शब्दात राऊतांनी त्यावेळेसची आठवण सांगितली. हे सुद्धा असेच पळून गेले. आता तीच परिस्थिती आपल्यावर आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान संजय राऊत यांनी आज बोलताना विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात यावा अशी मागणी, शिंदे गट व भाजपने केली आहे. राऊतांच्या विधानाने विधानसभेत जोरदार हंगामा झाला. त्यामुळे विधीमंडळाचे आजचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.