Election Commission : निवडणूक आयोगावरील आरोप संजय राऊतांना भोवणार – किरीट सोमय्या

Election Commission : निवडणूक आयोगावरील आरोप संजय राऊतांना भोवणार – किरीट सोमय्या

मुंबई : ‘मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती केली आहे की, एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यासाठी 2000 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी.’ अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये हे पत्र देखील दिले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘मी केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करतो की, पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी हा 2000 कोटींचा घोटाळा असल्याचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेत यावर योग्या ती कारवाई करण्यात यावी.’

Uddhav Thackeray म्हणतात… निवडणूक आयोगाविरोधात देशभर रान पेटणार!

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यातच आता खासदार संजय राऊत यांनीही आज एक गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवाय, यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये 2000 कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube