प्राचार्याला मारहाण करणं आमदार बांगर यांना भोवलं, बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

प्राचार्याला मारहाण करणं आमदार बांगर यांना भोवलं, बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली : प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli) गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबर महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी १८ जानेवारी रोजी दुपारी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण केली होती. मात्र, या घटनेनंतर तब्बल १० दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. यामुळे १० दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार संतोष बांगर कायम कोणत्या- कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा परत एकदा व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते.

या प्रकरणात प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत डॉ. अशोक उपाध्याय यांनी सांगितलं आहे की, आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा ४० जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सीसीटीव्हीचे, डीव्हीआरचे वायर तोडून ५ हजार रुपयांचे नुकसान केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube