Nashik Graduate Constituency : सत्यजित आला रे सत्यजित आला चौथ्या फेरीअखेरीस सत्यजित तांबेंचा विजय निश्चित

  • Written By: Published:
Nashik Graduate Constituency : सत्यजित आला रे सत्यजित आला चौथ्या फेरीअखेरीस सत्यजित तांबेंचा विजय निश्चित

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. चौथ्या फेरीतअखेरीस सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाला आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे.

चौथ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे 26385 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना चौथ्या फेरीअखेरीस एकूण 60161 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पहिल्या पसंतीची 33776 एवढी मते मिळाली आहेत. तसेच या मतदारसंघात मते बाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. चौथ्या फेरीअखेरीस 11240 मते बाद झाली आहेत. त्यामुळे आता विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. मतांचे गणित पाहता सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे आता फक औपचारिकता बाकी आहे.

चौथी फेरी

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.

➡️ सत्यजित सुधीर तांबे : 60161
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 33776
➡️ रतन कचरु बनसोडे : 2297
➡️ सुरेश भिमराव पवार : 649
➡️ अनिल शांताराम तेजा : 83
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 223
➡️ अविनाश महादू माळी : 1524
➡️ इरफान मो इसहाक : 68
➡️ ईश्वर उखा पाटील : 192
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 617
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 326
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 240
➡️ नितीन नारायण सरोदे : 223
➡️ पोपट सिताराम बनकर : 75
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 142
➡️ संजय एकनाथ माळी : 164
➡️ वैध मते : 100760
➡️ अवैध मते : 11240

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube