पुतळे जाळा, पण शाई फेकणं हिंसक, शाईफेक प्रकरणावर सत्यजित तांबेंनी व्यक्त केलं मत

पुतळे जाळा, पण शाई फेकणं हिंसक, शाईफेक प्रकरणावर सत्यजित तांबेंनी व्यक्त केलं मत

अहमदनगर : मंत्री चंद्रकांत पाटलांचे पुतळे जाळले असते तर काही नाही, मात्र, शाईफेकणं हिंसक वाटत, असल्याचं मत युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे. लेट्सअपशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

ते म्हणाले, महाविद्यालयीन जीवनापासून मी आंदोलनातच आहे. महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने मला सांगितलं की, तुझं चार वर्षांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आठ वर्षांत पूर्ण झालं तरी चालेल पण जीएस तूच झाला पाहिजे, असं त्यांनी मला सांगितलं होतं.

मी विद्यार्थी चळवळीतून तयार झालो असून आंदोलनांबाबतचं माझं ‘आंदोलन’ नावाचं पुस्तक असून मी आंदोलनाबाबतची भूमिका मांडलेली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मुळात मी आंदोलनातून तयार झालो असून आंदोलने करावीच लागतात. मी जरी आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बॅनरला काळं फासलं असेल तर ते प्रतिकात्मक आंदोलन होतं.

मी आणि समाजातील लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन केलं होतं. शाईफेकणं हे हिंसक वाटतं, अचानक जाऊन एखाद्याच्या चेहऱ्यावर शाई फेकणं हे चुकीचं वाटतं, असल्याचं ते म्हणालेत.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांचे पुतळे जाळले असते, तर काही वाटलं नसतं, मात्र, आंदोलनांमध्ये कोणाच्याही शरीराला इजा होऊ नये, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube