Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही

Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही

मुंबई : आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session) सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे विधानभवनात (Vidhanbhawan)उपस्थित राहिले. यावेळी तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नामांतरावरुन आमदार तांबे यांना प्रश्न केल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. फक्त शहरांची नावं बदलून काही होणार नसल्याचं यावेळी तांबे यांनी सांगितलं.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, महापुरुषांची महामानवांची नावं देऊन त्याच्यातून काही प्रेरणा मिळणार असेल, त्याच्यातून काही विचार मिळणार असेल तर मी त्याचं स्वागतचं करेल. पण शहरांची फक्त नावं बदलून काही विकास होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं सरकारनं नावं बदलत असताना त्या जिल्ह्यात भरीव असं काय ते काम करणार आहेत, याकडं देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !

यावेळी तांबे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घालमेल शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. नाशिक विभाग, उत्तर विभागातील सुशिक्षितांचे प्रलंबित प्रश्न आहेत, त्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं यावेळी आमदार तांबे यांनी सांगितलं. औद्योगिकीकरणाचा प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात समतोल राखला गेला. सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात समान प्रकारे उद्योगधंदे जाऊ शकले तर निश्चितच त्या त्या जिल्ह्यातून तरुणांना पुण्या मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, हा मुद्दा मी प्रकर्षानं अधिवेशात मांडणार असल्याचंही यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube