बौद्धांनी मातंगांच्या ताटातलं खाल्लं?…SC च्या उपवर्गीकरणावर मिलिंद आव्हाड बेधडक बोलले!

अनूसुचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते, आरक्षणाचे अभ्यासक मिलिंद आव्हाड यांनी लेट्सअपशी बोलताना आपली भूमिका मांडली.

Milind Awhad

Subclassification SC : कोणीही कोणाच्या ताटातलं खाल्लं नाही, ज्यांना मिळालं त्यांच्या संघर्षामुळे आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्या अज्ञानामुळे, असं मोठं विधान आरक्षणाचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड (Milind Avhad) यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. मुंबईत काल मातंग समाजाच्यावतीने मोर्चा काढून उपवर्गीकरणाची मागणी केलीयं. त्यावर आव्हाड यांनी आपली भूमिका मांडलीयं.

पुढे बोलताना मिलिंद आव्हाड म्हणाले, मातंग आणि नवबौद्ध समाज दोन्ही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आहेत. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही समाजात संघर्ष सुरु असून आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत. दोन्ही समाजातून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. मात्र, कोणीही कोणाच्या ताटातलं खाल्लं नाही, ज्यांना मिळालं त्यांच्या संघर्षामुळे आणि ज्यांना मिळालं नाही ते त्यांच्या अज्ञानामुळे असं मिलिंद आव्हाड यांनी स्पष्ट केलंय.

तसेच ज्याने कोणी लाभ घेतला, त्याने संविधानिक अधिकाराने घेतला आहे. राज्यात नवबौद्धांची प्रगती पाहता हा सामाजिक न्यायाचा यशस्वी टप्पा मानला जातो. आरक्षणाच्या वर्गीकरणाची लढाई, ही ज्यांना काही मिळालं नाही अशा समूहासाठी आहे. हा संरक्षित प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा म्हणून बघता येईल. या दोन्ही जाती एकमेकांच्या सोबती असून मातंग समाजाच्या लढ्याला राजकीय अंकित किंवा आश्रित म्हणणे हा मातंग समाजावर अन्याय होणार असल्याचं मोठं विधान आव्हाड यांनी केलं आहे.

भाजपला एससी एसटीमधील जाती आपल्या दावणीला बांधायच्या आहेत, ही शक्यता नाकारता येत नाही. 1990 नंतर तेलंगणा आंध्र प्रदेशात मादिका दंडोरा चळवळ सुरु झाली. या चळवळीनंतर चंद्राबाबू नायडू सरकारने उपवर्गीकरण करुन आरक्षण दिलं. या उपवर्गीकरणाच्या लढ्याला माझा पाठिंबा असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आहे.

राज्य लोकसेवा आयोगात दोन्ही समाजाची प्रगती पाहता बौद्ध समाजाचे 80 उपजिल्हाधिकारी दिसतील, त्याच तुलनेत मातंग समाजाचे दोन उपजिल्हाधिकारी दिसतील. ज्यांना मिळालंय, ती त्यांची स्वतंत्र प्रज्ञा चळवळ आणि संघर्षामुळे मिळालं आहे. ज्यांना मिळालं नाही ते या प्रक्रियेत उशिराने आले किंवा त्यांना याची जाणीव उशिरा झाली आहे. ज्यांना काही मिळालं नाही त्यांच्यातलं असलेलं अज्ञान, शिक्षण, पात्रता सामाजिक जाणीवेचा अभावामुळे मिळालं नाही, असंही मिलिंद आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us