Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

lok maze sangati sharad pawar

Sharad Pawar book Unveiled : देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन 2015 साली झालं होतं. आता या पुस्तकाचा भाग दोन येत आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे.

आज ‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. साधारण 11 वाजता हा सोहळा मुंबईतील वायबी सेंटरवर पार पडणार आहे. दरम्यान मागच्या काही दिवसात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, अजित पवार किंवा काही नेते भाजपसोबत जाणार याची चर्चा होत असतानाच शरद पवार या पुस्तकात काय खुलासे करणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. तसेच पहाटेचा शपथविधी या महत्त्वाच्या मुद्द्यावर पवार काय सांगणार? तसेच महाविकास आघाडीच्या स्थापनेवर त्यांनी काय सांगितले याकडेही लक्ष लागले आहे.

अन् अशी झाली महाविकास आघाडीची पेरणी; पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’त मोठा खुलासा

या नव्या भागात शरद पवार यांनी सध्याच्या काळातील काही खुलासे केले असल्याची शक्यता वर्तवली आहे. कारण या पुस्तकात साल 2014 ते 2023 या काळातील खुलासे केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या काही दिवसात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, अजित पवार किंवा काही नेते भाजपसोबत जाणार याची चर्चा होत असतानाच शरद पवार यांचे हे पुस्तक येणे म्हणजे यातून नवे खुलासे होतील, असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us