निलेश लंकेंच्या मनात तरी काय? अजितदादांबरोबर जंगी सभा, आता जयंत पाटलांची थेट ‘ऑफर’

  • Written By: Published:
निलेश लंकेंच्या मनात तरी काय? अजितदादांबरोबर जंगी सभा, आता जयंत पाटलांची थेट ‘ऑफर’

अहमदनगर: सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघही (Ahmednagar Loksabha) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी या मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची लढत ‘फिक्स’ मानली जात होती. लंके त्यापद्धतीने राजकीय खेळी करत थेट खासदार विखेंना अंगावर घेऊ लागले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार गटात दाखल झाले. आता लंकेही सरकारमध्ये आहेत. परंतु आता शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून त्यांना ऑफर येऊ लागली आहे. त्यामुळे निलेश लंकेंच्या मनात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्यांनी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, तेच आमच्या संपर्कात; जयंत पाटलांबाबत तटकरेंचं मोठं विधान

निलेश लंके हे मतदारसंघातील महिलांना नवरात्रीमध्ये मोहटादेवीचे दर्शन घडवितात. याच कार्यक्रमासाठी आयोजित सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपूर्वी सुपे येथे आले होते. त्यावेळी निलेश लंकेच्या बोर्डवर शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटोही लावण्यात आले होते. त्याची चर्चा झाली. त्यात आता निलेश लंके यांनी दसऱ्यापूर्वीच जाहीरपणे शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देऊ, अशी खुली ऑफर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी मुंबई बैठकीत दिली.

Letsupp Special : ललित पाटीलने किती मंत्र्यांना अडचणीत आणले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीत दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

या बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतरांची नावे आली. परंतु या बैठकीला काही लंके समर्थकही पदाधिकारी होते. पारनेरचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी बैठकीत आमदार लंके पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. पण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तरटे यांना मध्येच थांबवत हे स्वत: लंके यांना जाहीर करू द्या, असे सूचवत ते आमच्याकडेही आले तरी लोकसभेचे उमेदवारीच दसरापूर्वीच जाहीर करू अशी खुली ऑफरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube