ज्यांनी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, तेच आमच्या संपर्कात; जयंत पाटलांबाबत तटकरेंचं मोठं विधान

  • Written By: Published:
ज्यांनी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, तेच आमच्या संपर्कात; जयंत पाटलांबाबत तटकरेंचं मोठं विधान

Sunil Tatkare On Jayant Patil : अजित पवारांनी (Ajit Pawar) 2 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. अजित पवारांनी थेट पक्षावरच दावा ठोकून शरद पवारांना आव्हान दिलं. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली होती. यावर आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केलं.

Letsupp Special : ललित पाटीलने किती मंत्र्यांना अडचणीत आणले? 

आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्यांनी अजित पवार गटाचे 15 आमदार संपर्कात आहेत, असं वक्तव्य केलं तेच आमच्या संपर्कात आहेत. यावर मी जास्त बोलायची गरज नहाी. एखादा दुसरा आमदार सोडला तर सर्व आमदार अजितदादांसोबत असल्याचे पाहायला मिळतंय. विधीमंडळाच्या बैठकीलाही अनेक आमदार हजर राहत असतात, असं म्हटलं. जयंत पाटील यांच्या पोटातलं पाणी हलत नाही, डोळ्यातलं पाणी बदलत ना, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, दोन समाजाच्या मागण्या भिन्न आहेत. जरांगे यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लागता सरकारने काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारने कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असं तटकरे म्हणाले.

ते म्हणाले, सुनील कावळे या तरुणांने आज आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचललं. मुंबईत गळफास घेत या तरुणाने आयुष्य संपवलं. ही ही दुःखद घटना आहे. समाजाला आरक्षण मिळावं ही तीव्र भावना प्रत्येक समाजात असते. पण, असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

जयंत पाटील काय म्हणाले?
काल माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. अनेकांना पक्षात परत यायचे आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. पण मी आत्ताच त्याच्या खोलात जाणार नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, असं मला वाटतं. त्यांची काही कामं आहेत. ती झाली पाहिजेत. या आमदारांना पक्षात घ्यायचं की, नाही याचा निर्णय शरद पवार घेतील. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र, अजित पवार गटातील अऩेक आमदारांना परत येण्याची इच्छा आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील हेच आठ आमदारांसह आमच्या संपर्कात असल्याचं विधान केलं. तर आता सुनील तटकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळं आता जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube