Breaking News: शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज अचानक भेट घेतली. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले होतो. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगला सोडला आहे.
या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे. ही राजकीय भेट नव्हती. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत.त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. कोणतेही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
Ahmednagar : नामांतराच्या घोषणेने निघाली जिल्हा विभाजनाच्या जखमेची खपली; दोन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण…
राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका घेत आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटपही निश्चित झालेले नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही दिवसांपासून कुरबुरू सुरू आहेत. तिन्ही पक्षातील नेतेही एकमेंकाविरोधात टीकाही करत आहेत.
मुंडे, मुश्रीफ, पाटलांनी ‘दिल्ली’ ठेवली दूर! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आमदारकीच आवडीची
गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे. ही जागा लढविण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेदही उघडकीस आले आहेत. त्यानंतर पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्यामध्ये राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांनी तब्बल चाळीस मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाबरोबर इतर विषयांवर चर्चा झालेली आहे.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची कोणीही भेट घेऊ शकतात. त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.