मुंडे, मुश्रीफ, पाटलांनी ‘दिल्ली’ ठेवली दूर! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आमदारकीच आवडीची

मुंडे, मुश्रीफ, पाटलांनी ‘दिल्ली’ ठेवली दूर! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आमदारकीच आवडीची

Lok Sabha Election 2023

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आणि प्रमुख नेत्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढविण्यासाठी असमर्थता दर्शविली असल्याची माहिती आहे. १८ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये एकाही बड्या नेत्याने लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात जिल्हाध्यक्षांनी इच्छुकांची नाव कळवावी, असा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात तगडा उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक होणार हे स्पष्ट आहे. (Lok Sabha Election 2024, NCP Meeting held in Mumbai on the leadership of Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या २१ पैकी १८ जागांचा आढावा घेण्यात आला. यात पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, उस्मानबाद, बीड, परभणी, अहमदनगर आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तर काल बारामती, मावळ, रायगड, ईशान्य मुंबई , भंडारा-गोंदिया, नाशिक, दिंडोरी, बुलढाणा, जळगाव, अमरावती आणि रावेर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. दिलीप वळसे पाटील अनुपस्थित असल्याने शिरुरचा आढावा काही दिवसानंतर घेण्यात येणार आहे.

मावळसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ‘B’ : पार्थ पवार नसतील तर ‘या’ बड्या नेत्याची मुलगी रिंगणात!

या बैठकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांना बोलविण्यात आले होते. यावेळी मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज, राष्ट्रवादीची ताकद, काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद या गोष्टींची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. तसंच लोकसभेसाठी उमेदवार देखील सुचिवण्यात आले. मात्र पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील, हसन मुश्रीफ अशा ज्येष्ठ नेत्यांची नाव सुचविली. पण एकही बड्या आणि प्रमुख नेत्याने लोकसभेसाठी उत्सुकता दाखविली नाही. संबंधित नेत्यांनीच स्वतःच्या नावावर फुली मारली.

शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांच्या मनात 2 नावे! अमोल कोल्हे आणि….

काही नव्याने कारखानदार झालेले, तसेच इतर पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या काही व्यक्तींनी आपण निवडणूक लढवू इच्छित असल्याचे सर्वांसमोर सांगितले. या बैठकीत शरद पवार यांच्या समोर जिल्ह्या जिल्ह्यात असलेले वाद देखील चव्हाट्यावर आले असल्याचे बोलले जात आहे. त्यात जळगाव, रावेर, माढा आणि सातारा या मतदारसंघांमधील वाद समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जास्तीत जागा आपल्याला जिंकायच्या असून आपापसातील हेवेदावे आणि मतभेद विसरून कामाला लागा अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube