राजीनाम्याच्या घोषणेनंतर भगिनी सरोज पाटील शरद पवारांना काय म्हणाल्या?
शरद पवार यांची भूमिका बरोबर असून त्यांनी आधी पर्यायी नेतृत्व तयार करावं मगच खूर्ची सोडावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरलीय. त्यावर सरोज पाटील यांनी शरद पवारांना हा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाढील ढील पडणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; बावनकुळेंची टीका
सरोज पाटील म्हणाल्या, शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय धक्कादायक आणि खेददायक आहे. शरद पवारांच्या निर्णयामुळे देशात अराजकता माजली आहे. देशात आता लोकशाही जगणार की नाही? हा प्रश्न पडत असून राज्यात जातीवाद वाढत आहे, अशात पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेने दुख:द वातावरण तयार झालं आहे.
कार्यक्रमात शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, असं आवाहन केलं. तर काही कार्यकर्त्यांनी उपोषणही केलं. शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
कर्नाटकातील मराठी उमेदवारांच्या पराभवाचा भाजपाचा डाव, राज्यातून पुरवला पैसा; राऊतांचा घणाघात
शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लोकं आहेत, कितीही अडचणीत ते कधीच डगमगले नाहीत. देशात संविधान पायदळी तुडवलं जातंय, समोर ईडीचं संकट आहे. सत्ताधारी पक्षासमोर विरोधी पक्षनेता दुसरा कोणी दिसत नाही. पवारांनी कधीही कोणत्या टीकेला वाईट शब्दांत उत्तर दिलं नाही, त्यामुळे अशा सुस्ंकृत नेत्यांने राजीनाम्याची घोषणा केल्याचं दुख: होत आहे.
ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालयात जाणं हे… ‘लोक माझे सांगती’मध्ये पवारांनी काय लिहिलं?
शरद पवार यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला असून त्यांची भूमिकाही बरोबर आहे. आधी पर्यायी नेतृत्व तयार करा आणि मगच खूर्ची सोडा, अद्याप तुमच्यासारखा नेता कोणी नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी शरद पवारांनी दिलायं.
शरद पवार अनेक वर्ष जगले पाहिजेत, घोषणेनंतर लोकं सध्या अस्वस्थ झाले आहेत. लोकांच्या भावनांचा विचार करुन शरद पवारांना राजीनामा पुन्हा माघारी घेण्याचं आवाहनही सरोज पाटील यांनी केलं आहे.