Sharad Pawar Retirement : पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे सांगता येत नाही; पटोलेंंचं वक्तव्य

Sharad Pawar Retirement : पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे सांगता येत नाही; पटोलेंंचं वक्तव्य

Nana Patole  On Upcoming Vajramut Meeting : महाराष्ट्रातील भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभर वज्रमुठ सभा घेण्यात येत आहेत. आतापर्यंत संभाजीनगर, नागपूर, मुंबईमध्ये झाली आहे. पुढची सभा मे रोजी पुण्यात होणार आहे. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोडी पाहता, महाविकास आघाडीच्या ऐक्यासंबंधी साशंकता निर्माण झाली आहे. अशातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वज्रमुठ सभेविषयी मोठं वक्तव्य केलं. पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे सांगता येत नाही, असं पटोले यांनी सांगितलं.

काल शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलतांना राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भाऊक झाले होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. कार्यकर्त्यांना आंदोलनही केलं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. दरम्यान, आता नेते-कार्यकर्ते पवारांची मनधरणी करत आहेत. पवारांच्या या निर्णयावर अनेक पतिक्रिया येत आहेत. पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर मोठा परिमाण होणार असल्याचं बोलल्या जातं. सध्याच्या घडामोडी पाहता महाविकास आघाडीची सभा होणार की नाही, याविषयी स्पष्टता नाही.

वज्रमुठ सभेविषयी पटोले यांना विचारले असता, त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाईल असं मला वाटत नाही. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. उरला प्रश्न महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा… तर सध्या पावसाळा चालू झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. त्यामुळं या सभेविषयी एक मिटींग आज होणार आहे. त्यामुळं पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे लगेच सांगता येणार नाही. वज्रमुठ सभेविषयी बैठिकत निर्णय घेण्यात येईल, असं पटोले यांनी सांगितलं.

Sharad Pawar Resigns : जयंत पाटीलही राजीनामा देणार? कार्यालयाने दिलं स्पष्टीकरण…

पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे. मविआतील तीनही पक्ष भापजला चिटपट करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, महाविकास आघाडीतील नेत्यांची एकमेकांवर टीका करणं, अजित पवारांची भाजपशी असलेली जवळीक यामुळं महाविकास आघाडीत ऐक्य नसल्याचं बोलल्या जातं आहे. अशातच काल पवारांनी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळं आता राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या निर्णयाविषयी बोलतांना सांगितलं होत की, राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहे. परंतु, आणखी किती दिवस आमच्यासोबत राहील हे माहित नाही, असं वक्तव्यं केलं होतं.

दरम्यान, आता पटोलेंनी वज्रमुठ सभेविषयी केलेलं भाष्य पाहता, वज्रमुठ सभा होणार की, नाही, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube