Sharad Pawar Retirement : जयंत पाटीलही राजीनामा देणार? कार्यालयाने दिलं स्पष्टीकरण…
Jayant Patil Resigns after Sharad Pawar Resigns : मंगळवारी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचा काल प्रकाशन सोहळा झाला. या कार्यक्रमात पवारांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
त्यानंतर पवारांच्या घोषणेनंतर काल सभागृहात आक्रोश झाला. कार्यकर्ते भाऊक होऊन रडायला लागले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले होते. कार्यकर्त्यांना आंदोलनही केलं. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळं अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. दरम्यान, आता जर शरद पवार यांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही देखील आमचा राजीनामा देऊ, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक लोक म्हणत आहेत या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपल्या प्रदेशाध्य पदाचा राजीनामा देणार का? या चर्चांना उधान आले आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही. असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर मोठा निर्णय
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवार यांना एकटा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते नेहमी म्हणेत आलेत की नेत्यांनी लोकांचा विचार करुन चालले पाहिजे. त्यामुळे आमची ईच्छा आहे की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. त्यांच्या लेखी आमचे काहीही महत्व नाही का, असे म्हणत आव्हाडांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मी मानसशास्त्रज्ञ नाही, पण पवार साहेब यांचे आजारपणाचे कारण चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत.