Maharashtra Politics : पहाटेच्या शपथविधीवर…? शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : पहाटेच्या शपथविधीवर…? शरद पवारांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी परत एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (jayant patil ) यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं गौप्यस्फोट केलं होतं (Maharashtra Politics) याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला २ वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात परत एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत. जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील? देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचीही ती खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असं जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube