Barsu Refinery : शरद पवार-उदय सामंत भेट रद्द, रिफायनरीवर होणार होती चर्चा

Barsu Refinery : शरद पवार-उदय सामंत भेट रद्द, रिफायनरीवर होणार होती चर्चा

Sharad Pawar-Uday Samant Meeting cancelled : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात पुन्हा भेट हणार होती. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार होती. या भेटीमध्ये बारासू येथे रिफायनरी प्रकल्प येऊ घातला आहे. त्याबाबत काल ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या प्रकारानंतर ही भेट होणार होती. यावेळी रिफायनरी प्रकल्पामध्ये काही नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत का? याचिषयी उदय सामंत पवार यांना माहिती देतील अशी शक्यता होती.

नाशकात बिल्डरचे 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी व्यवहार, आयकर विभागाची कारवाई

मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ही भेट रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली होती. त्यानंतर आज ते दोघे प्रत्यक्ष भेटणार होते. मात्र आता ही भेट रद्द करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता ही भेट होणार होती.

दरम्यान काल उदय सामंत यांनी या प्रकरणावर बालताना म्हटले होते की, ‘बारसू मध्ये रिफायनरी (Barsu Refinery) व्हावी यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहलं नव्हतं. तर कोकणातील बारसूमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहलं होत.’ बारसूमध्ये रिफायनरी सर्व्हे विरोधात आंदोलन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube