‘मविआ’तील कोंडी कायम? एकाही ‘वज्रमूठ’ सभेला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत
मागच्या काही दिवसात महाविकास आघाडी राहणार कि फुटणार, अशा चर्चा होत असतानाच आता त्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक (Lok Sabha and Legislative Assembly Elections) आहे. या निवडणुकांसाटी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातारवण निर्मिती करत आहे. हे तीनही पक्ष करत आहेत. पण राज्यातील एकाही वज्रमूठ सभेला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. ‘टीव्ही ९’ याचे वृत्त दिले आहे.
“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?
शरद पवार यांच्या पुढाकारातूनच राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. जेव्हा जेव्हा महविकास आघाडीमध्ये दुफळी निर्माण झाली. त्यावेळी शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालून महविकास आघाडीतील वाद मिटवला आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला शरद पवार यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरत आहे.
अशातच काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा जोर धरु लागली.
“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर
काल अमरावती इथं शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी मविआच्या ऐक्याविषयी प्रश्न विचारेल. तेव्हा पवारांनी सांगितलं की, आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे. पण, फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत, यावर अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळं यावर आत्ताच मविआच्या ऐक्याविषयी बोलणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. आधीच मविआ त्यांच्या ऐक्याविषयी संभ्रम निर्माण झाला असतांना पवारंच्या विधानामुळं आता पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं.