Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांचा सीएम शिंदेंना फोन

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांचा सीएम शिंदेंना फोन

Sharad Pawar’s discussion with Chief Minister regarding Barsu Refinery : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात (Barsu Refinery Project) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन केल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना फोन करून त्यांनी बारसू रिफायनरी संदर्भात चर्चा केली आहे. रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला बारसू स्थानिकांकडून मोठा विरोध होत असतांना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेला फोन हा चर्चेचा विषय ठरत आहे.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सरकारी अधिकारी या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. गेल्या 4-५ दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडून इशारा दिल्या नंतरही स्थानिकांकडून आंदोलन सुरूच आहे. प्रांतिधिकारी यांना आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

Apmc Election Ahmednagar : जिल्ह्यातील बाजार समित्यांत 93 टक्के मतदान, कोण मारणार बाजी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पण, माघार घेणार नाही, ही आंदोलकांची भूमिका आहे. दरम्यान, या रिफायनरी संघर्ष समितीचे सदस्य हे आंदोलनचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांच्यासह शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी पवारांना आंदोलकांची बाजू ऐकली घेतली. त्यानंतर सीएम शिंदे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली.

या चर्चेमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तर यावेळी बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांची नेमकी कोणती भूमिका आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पवारांनी सांगितले की, तेथील स्थानिक लोक जर या प्रकल्पाला विरोध करत असतील तर त्या लोकांशी चर्चा करून निर्णय घ्या. त्याचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या, त्यामुळं सध्या हे काम थांबवा आणि आंदोलकांना भेटा, त्यांच्या शंकाचं निरसन झालं पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, याआधी राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळं सरकारकडून आता शरद पवारांना मध्यस्थी करून हा प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न सूर असल्याचं दिसतं. सामंत यांनी भेट घेतल्यानंतर आता पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या चर्चेतून आता यावर काय तोडगा निघतो, हे पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube