“…म्हणून तशी भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका” त्या वक्तव्यावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

  • Written By: Published:
“…म्हणून तशी भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका” त्या वक्तव्यावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा जोर धरु लागली.

अखेर आज त्यावर शरद पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले की, ” महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे मी तशी भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका.” अशी सारवासारव शरद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

याच मुद्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये ऐक्य राहावे, हीच भूमिका आमची आहे. पण नुसती इच्छा असून उपयोग नाही. तर जागावाटप झालं पाहिजे. तेच झालं नाही तर आतापासून काही सांगता येत नाही.” असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या स्पष्टीकरणानंतरही महाविकास आघाडीसमोरील प्रश्न वाढले आहेत.

“…तर राहतील त्यांना सोबत घेऊन लढणार” पवारांच्या ‘त्या’ वाक्यांवर नाना पटोलेंकडून उत्तर

दरम्यान केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातारवण निर्मिती करत आहे. हे तीनही पक्ष करत आहेत. पण राज्यातील एकाही वज्रमूठ सभेला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. ‘टीव्ही ९’ याचे वृत्त दिले आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना राऊत म्हणाले की अनेकदा पवारांच्या बोलण्याचा, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आत्ता या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत… तर आम्ही अद्याप एकत्र आहोत हे लोकांना सांगण्यासाठी. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहतील, असं राऊत म्हणाले.

“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा मोठा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्व यात फार आहे. ते महत्व कायम राहणार आहे. त्यांची भूमिका आहे की, महाविकास आघातील तीनही पक्ष एकत्र राहिले, तर 2024 च्या निवडणुकीत आपण भाजपचा पराभव करू शकू, लोकसभेतही भाजपला धोबीपछाड करू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube